गुरुचरित्र वाचत असताना गोकर्ण या तिर्थक्षेत्राचा उल्लेख आढळतो. सहाव्या अध्यायात याविषयी सविस्तर माहिती दिली आहे. पुलस्य ब्राह्मण आणि त्याची भार्या (पत्नी) कैकसी हे दोघे खूप धार्मिक होते. कैकसी ही नित्यनेमाने शिवपूजन केल्याशिवाय अन्नग्रहण करत नसे. एके दिवशी तिला पूजा करायला एकही शिवलिंग उपलब्ध नव्हते, तेव्हा तिने वाळूचे शिवलिंग तयार केले आणि त्याची मनोभावे पूजा केली. […]
