MARATHI POET | WRITER | ORATOR

SHRI GAJANAN MAHARAJ SHEGAON TEMPLE REOPEN WITH STRICT COVID-19 PROTOCOLS

Shri Gajanan Maharaj Shegaon temple reopened with strict Covid-19 protocols

कोरोनानंतर २०२० हे वर्ष बरचसं बदललं. जे आधी घडलं नव्हतं, ते सुद्धा बघायला मिळालं. लॉकडाऊन हा शब्द सगळ्यांसाठी नवीनचं होता. कोरोना आला खरा पण त्याच्यावर औषध काय द्यायचं ? हे कोणालाही माहिती नव्हतं. दिवसरात्र डॉक्टर संपूर्ण सहकाऱ्यांसह PPE KIT घालून लोकांना सेवा द्यायचे. ना झोपायची मुभा होती ना घरी जाण्याची. कितीतरी महिने त्यांना घरी जायला मिळाले नाही. पोलिसांची स्थितीही तशीच. मंदिरे बंद, कंपन्या बंद, दुकाने बंद, सगळं काही बंद. मात्र बँका, दवाखाने, मेडिकल बंद झाली नाही. लोकांनी ऑनलाईन पैश्यांच्या वापराला प्राधान्य दिलं. म्हणून बँकेतली गर्दीही कमी झाली. हळूहळू सर्व पूर्ववत व्हायला सुरुवात झाली. अखेर १६ नोव्हेंबर २०२० ला मंदिरं उघडण्याची घोषणा झाली. काही मंदिरांमध्ये सगळं पूर्ववत झालं पण काही मंदिरांमध्ये आता दर्शनाची व्यवस्था बदलवली. आज आपण श्री गजानन महाराज शेगाव मंदिराची व्यवस्था बघूया.

श्री गजानन महाराज संस्थान, शेगाव
कोरोना काळातलं विशेष व्यवस्थापन

श्री गजानन महाराज संस्थान, शेगावला दर्शनासाठी नि:शुल्क ई-पास सुविधा उपलब्ध आहे. त्यासाठी तुम्हाला http://gajananmaharaj.org:8080/ या संकेतस्थळावर भेट द्यावी लागेल. तत्पूर्वी तुम्हाला तुमचा आधार कार्डचा क्रमांक टाकावा लागेल. तो टाकल्यावर तुम्हाला ई-पास उपलब्ध होईल. ई – दर्शन पास काढतांना आधारकार्ड वरील पत्ता टाकणे/नोंदविणे गरजेचे आहे.

http://gajananmaharaj.org:8080/ या संकेतस्थळावर भेट द्यावी. खालच्या बाजूला E-Darshan Pass वर क्लिक करा.

आधार कार्डचा क्रमांक टाकावा पत्ता टाकताना आधारकार्ड वरील पत्ता टाकणे/नोंदविणे गरजेचे आहे.
सगळी माहिती भरल्यावर, पुन्हा एकदा तपासा. भरलेली माहिती बरोबर असेल तर Apply For Darshan E-Pass वर क्लिक करा.

श्री दर्शन सुविधेसंबंधी उपाययोजना व शासन निर्देशीत मार्गदर्शक सूचना आणि भाविकांसाठी उपलब्ध व्यवस्था.

१. श्री भक्तांनी दर्शनाकरीता येतांना श्री ई – दर्शन पास, आधारकार्ड, मास्क, सॅनिटायझर सोबत आणावे. त्याशिवाय प्रवेश मिळणार नाही.

२. ज्या भक्तांनी स्वतःचे किंवा दुसऱ्याचे स्मार्ट/ॲन्ड्रॉईंड फोनवरुन ई – दर्शन पास करीता नोंदणी केली असेल त्यांनी श्री ई- दर्शन पास/पासचा आय.डी. क्रमांक सोबत आणावा.

३. श्री दर्शनार्थी भाविकांनी ई – दर्शन पास काढतांना आधारकार्ड वरील पत्ता टाकणे/नोंदविणे गरजेचे आहे.

४. प्रत्येक दर्शनार्थी भाविकांसाठी स्वतंत्र ई- दर्शन पास असणे बंधनकारक राहील.

५. श्रींचे दर्शनाकरीता एक दिवस आधी ऑनलाईन बुकींग करुन घ्यावी.

६. श्री दर्शनार्थी भाविकांकरीता श्री महाप्रसाद सकाळी ९ ते रात्री ९ या वेळेत सुरु आहे.

७. श्री दर्शनार्थी भाविकांकरीता पर्याय म्हणून पादत्राणे ठेवण्याची नियमानुकूल स्वतंत्र व्यवस्था केली आहे.

८. प्रति दिवस नियमाप्रमाणे सरासरी ९,००० भाविकांना ई-दर्शन पासद्वारे श्रींचे दर्शनाचा लाभ घेता येईल.

९. श्री मंदिरात प्रवेश करतांना मास्क वापरणे, थर्मल स्क्रिनिंग व सॅनिटायझर करणे बंधनकारक राहील.

१०. हार, फुले, प्रसाद, नारळ, चिरंजी, पेढे, उदबत्ती, इत्यादी पुजेचे व प्रसादाचे साहित्य सोबत आणू नये. कोरोनाकाळात पारायण करता येणार नाही. म्हणून पोथी सोबत आणू नये.

११. ६ फुटाचे सामाजिक/सुरक्षीत अंतर ठेवावे लागेल.

१२. शासनाचे निर्देशानुसार १० वर्षाचे आतील व ६५ वर्षाचे वरील तसेच गर्भवती महिलांनी व रेड झोन, कन्टेंन्मेंट झोन व होम क्वारंटाईन असलेल्या भक्तांनी श्रींचे दर्शनाकरीता येऊ नये.

१३. श्रींचे दर्शनाकरीता निःशुल्क ई-दर्शन पासची सुविधा श्री संस्थेचे अधिकृत संकेतस्थळ (वेबसाईट) – www.gajananmaharaj.org या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. (नेट, कॅफे, सेतू, स्मार्ट फोनवरुन सुध्दा ई – दर्शन पासची सुविधा उपलब्ध करुन घेता येईल.)

टिप – ?श्री दर्शन सुविधा ही निःशुल्क आहे, कृपया भाविकांनी याची नोंद घ्यावी.
?भक्तनिवास संकूल व विसावा भक्तनिवास संकुल आणि आनंदविहार भक्तनिवास संकूल येथे भाविकांकरीता निवास व भोजन प्रसादाची व्यवस्था नियमानुसार उपलब्ध आहे.

संस्थानाकडून खालील प्रकारे काळजी घेतली जाते

?औष्णिक तपासणी (Thermal Screening)


?प्रत्येक ठिकाणी सॅनिटायझरची व्यवस्था


?कुठेही हात न लावता पाय धुण्याची व्यवस्था.
?दोन व्यक्ती मधलं सामाजिक अंतर.
?जेवताना एक खुर्ची रिकामी ठेऊन बसण्याची व्यवस्था (घरच्यांसोबत असाल तरीही एक खुर्ची रिकामी ठेऊन बसा).
?सगळे सेवेकरी मास्क घालून असतात त्यांच्याकडूनच आपण आदर्श घ्यायला हवा.
?रोखपाल (cashier) आपल्यासोबत माइक (mic) वर बोलतात जेणेकरून सामाजिक अंतर जपल्या जाईल.

श्री गजानन महाराज शेगाव संस्थानचं करावं तितकं कौतुक कमीच आहे. त्यांची “माऊली” म्हणून हाक मारायची पद्धत, सुव्यवसस्थापन हे कोणत्याही शाळेत/कॉलेजमध्ये शिकवल्या जात नाही. श्री संस्थानचं व्यवस्थापन ज्याप्रमाणे कोरोनाकाळात जशी सोय करत/पुरवत आहे त्याप्रकारचं नियोजन कुठल्याही विमानतळावर देखील नाही हे विशेष.
भक्तनिवास संकूल व आनंदविहार भक्तनिवास संकूल येथे भाविकांकरीता निवासाची व्यवस्था करण्यात येईल पण त्यासाठी ऑनलाईन ई-पास बंधनकारक आहे, ज्यांच्याकडे ई-पास आहे त्यांनाच रूम उपलब्ध होईल.

मला खात्री आहे कि तुम्हाला या लेखाची मदत नक्की होईल. हा लेख विशेषतः सगळ्या गजानन भक्तांसाठी आहे ज्यांना शेगावला जायचं आहे किंवा ज्यांना २०२० मध्ये जाता आलं नाही. त्या सगळ्यांना लवकरच श्री दर्शनाचा योग येईल. हा लेख श्री. अमित निनावे (भंडारा) यांच्या सांगण्यावरून मी लिहिला. त्यांनी माझ्यावर दाखवलेला विश्वास हा खूप मोलाचा आहे. हा लेख लिहिताना मला त्यांनी खूप मदत केली, विशेषतः मला लहान लहान बारीक गोष्टी त्यांनी सांगितल्या आणि त्यासोबतच छायाचित्र उपलब्ध करून दिले. जेणेकरून आपल्या सगळ्यांना सोयीचं ठरेल. हा लेख माझ्यासाठी खूप विशेष आहे. कारण २०२१ चा हा माझा पहिला लेख आहे जो मी श्री चरणी अर्पण करतो आहे.

गण गण गणात बोते भजन

श्री गजानन बावन्नी

|| गण गण गणात बोते ||

Spread the love

Related Posts

1 Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *