MARATHI POET | WRITER | ORATOR

Whatsapp Hacking

तुमचा Whatsapp कुणाच्या ताब्यात तर नाही ना ?

महाराष्ट्र राज्यात कोरोनासोबत गुन्हेगारी क्षेत्रात फार मोठी वाढ कोरोनानंतर बघायला मिळत आहे. काही लोकांना हॅकर्सकडून बराच गंडा बसलेला आहे. लोकांच्या बँक खात्यातून सरसकट पैसे काढले जात आहे. अशातच आता हॅकर्सनी नवीन शक्कल लढवली आहे. ती म्हणजे – हॅकर्स तुम्हाला व्हाट्सअप्पवर तुमच्या जवळच्या व्यक्तीच्या नावाने मेसेज करतात. मेसेजमध्ये –
Hi
Please send OTP

असा मेसेज येतो.

आपली जवळची व्यक्ती समजून आपण तो OTP त्याला देतो. हॅकर त्या OTP नी तुमच्या व्हाट्सअप्प अकाउंटवर ताबा मिळवतो आणि तुमच्या मोबाईल मधल्या बाकी contacts ला तसाच मेसेज करतो. बऱ्याच जेष्ठ नागरिकांना त्यांच्या मुलांच्या नावाने मेसेज आले आणि त्यांना OTP शेअर करण्याची विचारणा झाली. OTP शेअर करताच हॅकर्सनी व्हाट्सअप्पवर ताबा मिळवला.

आज हा प्रकार साखळी सारखा पसरत चाललेला आहे. तेव्हा सतर्कतेचा इशारा म्हणून हा मेसेज सर्व तरुण आणि वयोवृद्ध लोकांना जरूर पाठवा. सोबत घरातल्या लहान मुलांना देखील याची माहिती द्या आणि त्यांना पण कोणाला OTP शेअर करायला देऊ नका. ऑनलाइन शाळेमुळे बराच वेळ मुलांच्या हातात मोबाईल असतो म्हणूनच जास्त सतर्क राहायला हवं.

👉 टीप- सगळ्या जेष्ठ नागरिकांना नम्र विनंती, तुम्हाला असा मेसेज आल्यास आधी ज्याच्या नावाने मेसेज आला आहे (उदा. मुलगा/सून/ इतर जवळची व्यक्ती) त्याला फोन करून खात्री करून घ्या आणि तो OTP त्याला कशाला हवा आहे हे विचारा म्हणजे जेणेकरून तुमची फसवणूक होणार नाही.

हा मेसेज महाराष्ट्रातल्या जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा जेणेकरून कोणीही या विकृतांना बळी पडणार नाही.

Spread the love

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *