MARATHI POET | WRITER | ORATOR

Category: Spiritual

माघी “गणेश जयंती” म्हणजे काय ?

गणेश जयंती हा दिवस माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला येतो. या दिवशी गणपतीचा जन्मोत्सव साजरा होतो. पार्वती देवीला स्नानासाठी जावयाचे होते. पण आसपास लक्ष ठेवण्याकरता कोणीच नव्हते. तेव्हा पार्वती देवीने आपल्या अंगावरील मळाने एक मूर्ती बनवली आणि ती जिवंत केली. या मूर्तीला पहारेकरी नेमलं आणि सांगितलं की, कोणालाही आतमध्ये येऊ देऊ नकोस. असे सांगून […]

श्रीगुरुचरित्रातील प्राकृत मराठी भाषेत “बलात्कार” म्हणजे नक्की काय

गुरुचरित्र वाचत असताना गोकर्ण या तिर्थक्षेत्राचा उल्लेख आढळतो. सहाव्या अध्यायात याविषयी सविस्तर माहिती दिली आहे. पुलस्य ब्राह्मण आणि त्याची भार्या (पत्नी) कैकसी हे दोघे खूप धार्मिक होते. कैकसी ही नित्यनेमाने शिवपूजन केल्याशिवाय अन्नग्रहण करत नसे. एके दिवशी तिला पूजा करायला एकही शिवलिंग उपलब्ध नव्हते, तेव्हा तिने वाळूचे शिवलिंग तयार केले आणि त्याची मनोभावे पूजा केली. […]

श्री गजानन महाराज संस्थान व्यवस्थापन आणि श्रींचे चार धाम

“विदर्भाची पंढरी” आपण मानाने ज्या भूमीला म्हणतो ती पावनभूमी दुसरी तिसरी कोणती नसून आपल्या श्री गजानन महाराजांची शेगावनगरी आहे. शेगाव म्हटलं की डोळ्यासमोर येतं ते म्हणजे स्वच्छता, कामांचं नियोजन, आणि माऊली या शब्दातली जादू. एक संत आपल्या लहान-लहान कृतीतून जनसमुदायाला कसे घडवत जातात ते आपल्याला शेगावच्या गजानन महाराजांनी शिकवलं. पातूरकरांच्या ऋतुशांती कार्यक्रमा दरम्यान उष्ट्या पत्रावळीतले […]

SHRI GAJANAN MAHARAJ SHEGAON TEMPLE REOPEN WITH STRICT COVID-19 PROTOCOLS

Shri Gajanan Maharaj Shegaon temple reopened with strict Covid-19 protocols

कोरोनानंतर २०२० हे वर्ष बरचसं बदललं. जे आधी घडलं नव्हतं, ते सुद्धा बघायला मिळालं. लॉकडाऊन हा शब्द सगळ्यांसाठी नवीनचं होता. कोरोना आला खरा पण त्याच्यावर औषध काय द्यायचं ? हे कोणालाही माहिती नव्हतं. दिवसरात्र डॉक्टर संपूर्ण सहकाऱ्यांसह PPE KIT घालून लोकांना सेवा द्यायचे. ना झोपायची मुभा होती ना घरी जाण्याची. कितीतरी महिने त्यांना घरी जायला […]

Shri Ganesh Pujavidhi

श्री गणपती षोडशोपचार प्राणप्रतिष्ठापना व पूजाविधी

काय, झाली का तयारी गणेशोत्सवाची ?? नाही ?? मग वाट कसली बघताय ?? काय ??? गुरुजी मिळाले नाहीत म्हणून तुम्ही एवढे पेचात दिसत आहे का. बरं… गुरुजी येऊ शकत नाही. म्हणून बाप्पाला बसवायचं कि नाही यासाठी एवढा विचार ??? तो तर आपला सण आहे. हा… म्हणून आपल्या सर्वांसाठी श्री गणेश स्थापना आणि पूजाविधी शास्त्रोक्त मंत्रांसहित […]