तुम्ही जर नोकरी/व्यवसाय/शिक्षणा निमित्ताने आपल्या गावापासून दूर स्थलांतर केलं असेल आणि तुम्हाला यंदा मतदान करायला तुमच्या शहरात यायला मिळालं नसेल तर हरकत नाही. अजूनही वेळ गेलेली नाही. मुंबई-पुण्यात राहणाऱ्या तमाम मराठी बांधवांसाठी मतदानाची संधी अजून आहे. पुण्यात १३ मे ला मतदान आहे. मुंबई आणि उपनगरात २० मे ला मतदान आहे. मतदान ओळखपत्राचा पत्ता फक्त सात दिवसात बदलता येतो. मुंबई – पुण्यात राहणाऱ्या लोकांसाठी हि खूप छान संधी उपलब्ध आहे. त्या संधीचा फायदा घ्या.
तुम्हाला मतदान करायची इच्छा असेल तर तुम्हाला तुमचा मतदानाचा पत्ता बदलावा लागेल. त्यासाठी काय काय करावं लागतं हे आपण आता बघू.
१. सर्वप्रथम तुम्ही ज्या भागात राहता त्या भागातल्या स्थानिक रहिवासीकडून यादी भाग क्रमांक (Part Number) आणि अनुक्रमांक (Serial Number)
२. तुमचं स्वतःच मतदान ओळख पत्र क्रमांक
३. सध्याचा पत्ता आणि दस्तऐवजाचा (Documents required for the address change) फोटो JPG format मध्ये. फोटोची size २ MB पेक्षा जास्त नको.
निवडणूक आयोगाने खास मतदारांसाठी youtube वर मार्गदर्शनासाठी एक विडिओ टाकलेला आहे. तो विडिओ मी खाली देत आहे. मला खात्री आहे तुम्ही लवकरच आपला मतदानाचा नैतिक अधिकार उपभोगाल आणि मतदानाची टक्केवारी वाढवायला मदत कराल.
Siddhesh is a marathi poet and writer. He is a author of Marathi book named “Varadhast.”