MARATHI POET | WRITER | ORATOR

तू Gen Z आहेस का ?

तू Gen Z आहेस का ?

हे शीर्षक आपण बऱ्याचदा उपहासाने बोलून जातो, पण Gen Z ही generation झेंडू नाही तर खऱ्या अर्थाने Generation जी काहीतरी करण्यासाठी धडपडते. Gen Z मधल्या Z चा अर्थ असा पण होत असावा-
Zealous – म्हणजे उत्साही
Zippy – अति उत्साही
Zestful – उत्साहाने भरलेले.
Zappy – उर्जेने परिपूर्ण किंवा उत्साही.

आणि असं खरंच असावं. या generation चं खरंच खूप कौतुक आहे. आपल्या पिढीने इंटरनेट (internet), मोबाईल पहिल्यांदा बघितला आणि वापरलासुद्धा. आपण landline वापरले, coin टाकून फोनचा डब्बा वापरला. कदाचित या पिढीने ते वापरलं नसेल. पण इंटरनेट प्रत्येक गोष्टीत कसा वापरायचा हे ह्या पिढीकडून शिकण्यासारखं आहे. कुठे ही काही अडले तर बघ google वर, किंवा chatgpt वर. मी खऱ्या अर्थाने chatgpt चा उपयोग कधी करावा हे ह्या पिढीकडून शिकलो. ही पिढी संपूर्णपणे बोटांवर चालते, बोटांवर धावते, बोटांवर ऐकते आणि बोटांवर नाचते सुद्धा. सगळं काही मोबाईच्या एका टच वर सुरू आहे ह्या पिढीचं काम.
भूक लागली तर कर झोमॅटो, सामान संपलं कर instamart, कपडे घायचे आहे कर myntra. आणि Gen Z यात सगळ्यात आघाडीवर आहेत. त्यांच्यामुळेच ह्या सर्व माध्यमांना पैसे मिळत आहे हे तर आहेच. कालच एक विडिओ बघितला “संजय अप्पम” सर मुंबईचे एक शिक्षक कॉमर्स (commerce) चे क्लास घेतात, आणि त्यांचे विडिओ ते समाज माध्यमांवर (social media) टाकतात. त्यात ते महाभारतावर प्रश्न उत्तर विचारात होते. विशेष म्हणजे मुलं त्या सरांना प्रश्न विचारायचे आणि सर त्यावर उत्तर द्यायचा प्रयत्न करत होते. यामुळे शिक्षक मुलांमधलं अंतर कमी झालं, आणि सगळी मुलं महाभारत वाचायला लागले. मुलंच नाही, सर पण वाचायला लागले. एवढंच नाही ते व्हिडिओ बघणारे लोकं सुद्धा वाचायला लागली. किती छान गोष्ट घडली, आणि हे तेच Gen Z आहेत, कळलं का ?
ह्या सगळ्यांचं जसं कौतुक आहे, तसंच एक चिंता सुद्धा या पिढीमुळे वाढत आहे. Gen Z पिढी कार्यालयीन कामात, बाहेरच्या कामात कुठे तरी कमी पडताना दिसतात. त्यांना बाहेर न पडल्यामुळे भाजीचे दर, वाण सामानाचे दर माहिती नसतात. म्हणजे खरे दर काय आहेत ह्याची त्यांना काहीच कल्पना नसते. अश्यात ते instamart, Zepto सारखे माध्यमांवर जितकी रक्कम असेल तितकी ते देऊ करतात. आणि दुसरी गोष्ट Gen Z सोबत आपण सुद्धा या माध्यमांवर विसंबून राहायला लागलेलो आहे. त्यामुळे आपण आळशी झालो आहे, आणि डिलिव्हरी चार्जेस वाचवायला आपण उगाच कारण नसताना त्यात सामान वाढवायला लागलेलो आहे, त्यामुळे आपण पैसे उगाच अनावश्यक खर्च करायला लागलो. ह्याचा विचार Gen Z सोबत आपल्यालाही करायला हवा.
कितीतरी गोष्टी वेळोवेळी त्यांच्याकडून आपण कळत नकळत काहीना काही शिकत असतो. आपण एकमेकांकडून असेच शिकत राहू, आणि एकमेकांना न डिवचता कार्य करू.
तथास्तु Gen Z 🙏

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *