MARATHI POET | WRITER | ORATOR

Tag: gajanan

गजानन महाराज आणि त्यांचे परमभक्त

श्री गजानन महाराज आणि त्यांचे परमभक्त

श्री संत गजानन महाराज हे महाराष्ट्रातील संतपरंपरेतील एक तेजस्वी संत आहेत. शेगाव ही त्यांची कर्मभूमी असली, तरी त्यांच्या असंख्य लीलांनी आणि परमभक्तांच्या माध्यमातून अनेक स्थळे आजही पवित्र मानली जातात. विदर्भाची पंढरी म्हणजे आपल्या श्री गजानन महाराजांचं शेगाव. मुंबई – हावडा या रेल्वेमार्गावर एक छोटंसं शेगाव हे गजानन महाराजांमुळेच प्रसिद्धीस पावलं. आज गजानन महाराजांची भक्त मंडळी फक्त विदर्भातचं नाही तर भारतभर, विश्वभर वेगाने वाढत आहे. कारणही तसंच आहे. “शेगाव सारखी स्वच्छता, “माऊली” म्हणून हाक मारणारे सगळे भक्तगण आणि मंदिराचं चौकटी पलीकडचं व्यवस्थापन. भारतभर तुम्ही कितीही-कुठेही फिरा पण शेगावसारखी शांतता तुम्हाला कुठेही बघायला मिळणार नाही. पक्ष्यांचा किलबिलाट, टाळ मृदूंगाचा नाद तुमच्या कानाला नवे सूर आणि जीवनाकडे बघण्याचा एक वेगळा दृष्टिकोन देतात.”

श्री गजानन महाराज संस्थान व्यवस्थापन आणि श्रींचे चार धाम

“विदर्भाची पंढरी” आपण मानाने ज्या भूमीला म्हणतो ती पावनभूमी दुसरी तिसरी कोणती नसून आपल्या श्री गजानन महाराजांची शेगावनगरी आहे. शेगाव म्हटलं की डोळ्यासमोर येतं ते म्हणजे स्वच्छता, कामांचं नियोजन, आणि माऊली या शब्दातली जादू. एक संत आपल्या लहान-लहान कृतीतून जनसमुदायाला कसे घडवत जातात ते आपल्याला शेगावच्या गजानन महाराजांनी शिकवलं. पातूरकरांच्या ऋतुशांती कार्यक्रमा दरम्यान उष्ट्या पत्रावळीतले […]

SHRI GAJANAN MAHARAJ SHEGAON TEMPLE REOPEN WITH STRICT COVID-19 PROTOCOLS

Shri Gajanan Maharaj Shegaon temple reopened with strict Covid-19 protocols

कोरोनानंतर २०२० हे वर्ष बरचसं बदललं. जे आधी घडलं नव्हतं, ते सुद्धा बघायला मिळालं. लॉकडाऊन हा शब्द सगळ्यांसाठी नवीनचं होता. कोरोना आला खरा पण त्याच्यावर औषध काय द्यायचं ? हे कोणालाही माहिती नव्हतं. दिवसरात्र डॉक्टर संपूर्ण सहकाऱ्यांसह PPE KIT घालून लोकांना सेवा द्यायचे. ना झोपायची मुभा होती ना घरी जाण्याची. कितीतरी महिने त्यांना घरी जायला […]