“विदर्भाची पंढरी” आपण मानाने ज्या भूमीला म्हणतो ती पावनभूमी दुसरी तिसरी कोणती नसून आपल्या श्री गजानन महाराजांची शेगावनगरी आहे. शेगाव म्हटलं की डोळ्यासमोर येतं ते म्हणजे स्वच्छता, कामांचं नियोजन, आणि माऊली या शब्दातली जादू. एक संत आपल्या लहान-लहान कृतीतून जनसमुदायाला कसे घडवत जातात ते आपल्याला शेगावच्या गजानन महाराजांनी शिकवलं. पातूरकरांच्या ऋतुशांती कार्यक्रमा दरम्यान उष्ट्या पत्रावळीतले […]