MARATHI POET | WRITER | ORATOR

माघी “गणेश जयंती” म्हणजे काय ?

गणेश जयंती हा दिवस माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला येतो. या दिवशी गणपतीचा जन्मोत्सव साजरा होतो. पार्वती देवीला स्नानासाठी जावयाचे होते. पण आसपास लक्ष ठेवण्याकरता कोणीच नव्हते. तेव्हा पार्वती देवीने आपल्या अंगावरील मळाने एक मूर्ती बनवली आणि ती जिवंत केली. या मूर्तीला पहारेकरी नेमलं आणि सांगितलं की, कोणालाही आतमध्ये येऊ देऊ नकोस. असे सांगून पार्वतीमाता स्नानासाठी आत गेली. त्यालाच गणेश जन्म (जयंती) म्हणतात.

मग भाद्रपदात येणारी गणेश चतुर्थीला काय झालं? १० दिवसांचा गणपती का बसवतात ?

आपण सगळे दर वर्षी गणपती बसवतो पण का बसवतो याचे कारण बऱ्याच कमी लोकांना माहिती असेल. आपल्या धर्म ग्रंथानुसार भगवान वेद व्यास ऋषि यांनी महाभारत हे महाकाव्य रचले, परंतु त्यांना त्याचे लिखाण करणे शक्य होत नव्हते म्हणून त्यांनी श्री गणेशाची आराधना केली आणि गणेशाला महाभारत लिहिण्याची विनंती केली. त्या वेळी गणपतीने होकार दिला. हे लिखाण दिवस रात्र चालले आणि त्यामुळे गणपतीला थकवा आला, आणि शरीरातील पाणी ही वर्ज्य झाले अशा वेळी गणपतीच्या शरीराचे तापमान वाढू नये म्हणून व्यास यांनी श्री गणपतीला मृत्तिकेचे म्हणजे मातीचे लेपन केले आणि भाद्रपद शुक्ल चतुर्थीला गणपतीची यथा सांग पूजा केली. मातीचे लेपन केले म्हणून गणपती आखडून गेला म्हणून याला “पार्थिव गणेश” असे नाव पडले. हे लिखाण दहा दिवस चालले. अनंत चतुर्दशीला हे लिखाण संपल्यावर व्यास यांनी गणपतीकड़े पाहिले असता त्याच्या शरीराचे तापमान खुप वाढले होते. हे तापमान कमी व्हावे आणि गणपतीच्या अंगावरची माती निघावी म्हणून व्यासांनी गणपतीला पाण्यात विसर्जित केले. या दहा दिवसात व्यासांनी गणपतीला खाण्यास वेगवेगळे पदार्थ दिले. तेव्हा पासून गणपती बसवण्याची प्रथा पडली.

श्री गणेशाची कृपा आपल्यावर सदैव राहो हीच माझी गणेशास प्रार्थना आणि आपण सर्व भक्तास श्री गणेश जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा

Spread the love

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *